साईबाबा संस्थानला ४ कोटी १० लाख रूपयांच्या देणग्या

saibaba
शिरडी – दसर्‍यादिवशी शिर्डीत साजर्या झालेल्या साईबाबांच्या ९६ व्या पुण्यतिथीनिमित्ताने गेल्या तीन दिवसांत शिर्डीला लक्षावधी भाविकांनी भेट दिली असून या तीन दिवसांत संस्थान ट्रस्ट कडे ४ कोटी १० लाखांहून अधिक रकमेच्या देणग्या जमा झाल्या असल्याचे समजते. यात रोकड, सोने चांदी आणि परदेशी चलनाचा समावेश आहे.

संस्थान ट्रस्टचे अधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन दिवसांत ४,१०,७७००० रूपयांच्या देणग्या जमा झाल्या आहेत. या तीन दिवसांत साईबाबांच्या दर्शनासाठी अलोट जनसागर लोटला होता. जमा झालेल्या देणग्या ऑनलाईन, कॅश कौंटर,चेक, ड्राफ्ट आणि दसर्‍यादिवशी गावातून काढण्यात आलेली पालखी अशा सर्व ठिकाणी जमा झाल्या आहेत. यात सोने चांदीचे दागिने, रोख पैसे आणि परदेशी चलनाचाही समावेश आहे. कांही भक्तांनी अन्नछत्रासाठीही देणग्या दिल्या आहेत. अकौंटंट दिलीप झिरपे यांनी दिलेल्या माहितीनुसार ९ हजार नोटा परदेशी चलनाच्या स्वरूपात आहेत.

Leave a Comment