मेस्सी आणि नेमार यांच्या बळावर बार्सिलोना विजयी !

football
बार्सिलोना – लियोनेम मेस्सी आणि नेमार यांच्या गोलच्या बळावर स्पेनच्या फुटबॉल लीग ला लीगाटमध्ये अव्वल स्थानी असलेल्या बार्सिलोनाने ९ खेळाडूंसह खेळणा-या रायो वालेकानोला २-० ने हरविले. मेस्सीने ३५ व्या मिनिटात प्रतिस्पर्धी गोलकीपर एंटोनियो टोनो रोड्रिगेजला चकवत शानदार गोल केला. मेस्सीचा हा लीग मधिल २४९ वा गोल आहे आणि तो लीगमध्ये सर्वाधिक गोल करणा-या तेल्मो जाराच्या विक्रमापेक्षा २ गोलने मागे आहे. जाराचा हा विक्रम १९५५ पासून कुणीही मोडू शकला नाही. सामन्यात मेस्सीने गोल केल्यानंतर एका मिनिटानंतर नेमारने देखील लीगमध्ये आपला सातवा गोल केला. ज्यात संघाने २-० ची आघाडी मिळविली, जी अखेरर्यंत कायम होती. या दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत लीगमध्ये बार्सिलोनाच्या एकूण १९ गोलमधून १३ गोल केले आहेत. बार्सिलोनाचा हा लीगमधील सहावा विजय आहे आणि त्यांचा एक सामना अनिर्णित राहिला आहे. बार्सिलोनाचे १९ गुण आहेत आणि त्यांनी दुस-या क्रमांकावर असलेल्या वेलेंसियावर दोन गुणांनी आघाडी मिळविली होती, त्यांचे १७ गुण होते. दुसरीकडे वेलेंसियाने एटलेटिको माद्रिदला ३-१ ने हरविले. गत विजेता एटलेटिको माद्रिदचा या लीगमधील पहिला पराभव आहे आणि ते १४ गुणांसह तिस-या स्थानी कायम आहेत.

Leave a Comment