मनसे `मराठी मतां’साठी परप्रांतीयांसमोर’ !

mnse
मुंबई – वेळोवेळी परप्रांतियांना मारहाण करून आपले मराठीचे प्रेम दाखवणा-या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणूकीत मात्र परप्रांतिय उमेदवारी द्यावीशी वाटली आहे. कांदिवली पूर्व मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वकील असलेल्या अखिलेश चौबे यांना मनसेने उमेदवारी दिली आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांचे पुत्र अमित आणि पत्नी शर्मिला ठाकरे पोचल्या आहेत. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील असलेले चौबे हे पक्षाचे सरचिटणीस असून एकमेव उत्तर भारतीय उमेदवार आहेत. एवढेच नव्हे तर ते आतापर्यंतचे पक्षाचे पहिले परप्रांतीय उमेदवार ठरले आहेत. चौबे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्याच प्रांतातील लोकांना विरोध करत नाही. तर विकास करणा-या कोणाही भारतीयाचे स्वागतच करते. आम्हाला परप्रांतातील माणसे हवी आहेत. ज्यांना महाराष्ट्राचा विकास हवा आहे आणि स्वत:चा विकास देखील असे चौबे यांनी सांगितले. कांदिवली पूर्व भागात उत्तर भारतीयांची मोठी संख्या आहे आणि त्यांच्या शिवाय मनसेला विजय ज्ञिळवणे शक्य नाही. तसेच मराठी गुजराती मतदारांची निर्णायक मते आहेत. एकूण २,७२,००० मतदारांपैकी ९० हजार उत्तर भारतीय, ६० हजार गुजराती आणि ७४ हजार मराठी मतदार येथे आहेत. चौबे म्हणाले की, पक्ष परप्रांतीयांच्या विरोधात असता तर मला उमेदवारी मिळाली असती. मनसेने परप्रांतीयांचा मुद्दा सोडला असून त्यांना विकासाचा मुद्दा महत्वाचा वाटत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत झाले आहे.

Leave a Comment