नक्षलवाद्यांचे निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन

naxlite
गडचिरोली – अहेरी तालुकास्थळापासून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या इंदाराम व देवलमरी येथे प्रवासी निवार्‍याला नक्षलवाद्यांचे बॅनर लावलेले आढळून आले आहे. यामध्ये नक्षल्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. शिवाय काँग्रेस, राकाँ, भाजप व शिवसेना या पक्षांना विरोध दर्शविला आहे. इंदाराम येथे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाजवळ असलेल्या जुन्या प्रवासी निवार्‍याला हे बॅनर बांधले होते. देवलमरी येथेही अशाप्रकारचे बॅनर बांधण्याचे दिसून आले.

Leave a Comment