गोवा पोलिसांनी भाजप, कॉंग्रेस पदाधिका-यांवर दाखल केले गुन्हे !

goa
पणजी – दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पणजी पोलिसांनी भारतीय जनता पक्षाच्या तसेच कॉंग्रेसच्या पादधिका-यांसह दोन संस्थांवर बेकायदा विदेशी चलन बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सेसा गोवा लिमिटेड या संस्थेकडून या दोन्ही पक्षांच्या पदाधिका-यांनी पाच कोटी रुपये स्वीकारले. युरोपमध्ये मुख्य कार्यालय असलेल्या वेदांता आणि मद्रास ॲल्युमिनियम कंपनी लि. आणि सेसा गोवा लि.च्या संचालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. असे असले तरी याबाबतच्या गुन्ह्यांची नोंद करतांना कोण्या व्यक्तीच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. भारतीय दंड संहितेच्या वेगवेगळ्या कलमांसह विदेश चलन बेकायदा बाळगल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात अले असून पणजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिका-यांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या वर्षीच्या जानेवारी महिन्यात याबाबतचा प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात भाजपचे मुख्यमंत्री पर्रीकर, तसेच माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर आणि विनय तेंडुलकर तसेच इतर पदाधिका-यांची नावे होती. २०१२ मध्ये सेसा गोवा कंपनीकडून त्यांनी काही निधी परकीय चलनातून मिळवला होता, असा आरोप करण्यात आला होता.

Leave a Comment