आयएसने इराक सिरीयात भरविले महिला गुलामांचे बाजार

bajar
बगदाद- इराक आणि सिरीयातील कांही भागावर कब्जा केलेल्या इस्लामिक स्टेटच्या सुन्नी दहशतवाद्यांनी तरूण युवकांनी संघटनेकडे आकर्षित व्हावे या उद्देशाने बंधक बनविलेल्या ख्रिश्चन आणि ज्यू महिला व मुलांना गुलाम बनवून त्यांचे बाजार भरविले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघाच्या तपास अधिकार्‍यांनी हा दावा केला असून त्यांच्या अहवालानुसार सुमारे २५०० महिला व मुले इसिसने बंधक म्हणून ताब्यात घेतली आहेत.

या महिलांना सामुहिक बलात्कार आणि लैगिक अत्याचारांचा सामनाही करावा लागत आहे. शिवाय १० डॉलर्स म्हणजे साधारण ६१० रूपयांत त्यांची गुलाम म्हणून विक्रीही केली जात आहे. हा बाजार जाणीवपूर्वक भरविला जात असून त्यामागे या संघटनेकडे तरूणांनी आकर्षित व्हावे आणि नवीन भरती होऊन संघटनेची ताकद वाढावी हाच उद्देश आहे. मोसुल जवळील अल कुदस आणि सिरीयातील रक्का येथे असे बाजार भरविले गेले आहेत.

यातील कांही महिलांनी गुप्तपणे वृत्तपत्रांना दिलेल्या माहितीनुसार त्यांना जनावरापेक्षाही वाईट वागणूक दिली जात आहे. सामुहिक बलात्कार नित्याचेच झाले आहेत शिवाय १० ते १२ डॉलर्समध्ये त्यांना विकले जात आहे. एकेका महिलेला १० जणांच्या हवाली केले जात आहे आणि बंधक बनविलेल्या सर्व महिला व मुले ख्रिश्चन आणि ज्यूधर्मिय आहेत.

Leave a Comment