`… अरे कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा’ने वाढवला भाजपचा गाजावाजा !

bjp
मुंबई – निवडणूक प्रचाराचे शेवटचे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. आणि सर्वच राजकीय पक्षांनी जाहिरातींचा भडिमार सुरू केला आहे. मात्र समूह संपर्क माध्यम व्हॉटस ॲप वरून केल्या जाणा-या भारतीय जनता पक्षाच्या जाहिराती सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या जाहिरातीचे अनुकरण विडंबन आणि वापर जोरदारपणे केला जात आहे. त्यावर विनोद देखील पाठवले जात आहेत. भाजपने आघाडी सरकारवर टिका करतांना अरे कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा, असे पालूपद आळवले आहे. त्यावर काही विनोद सांगितले जात आहेत ते असे बूमरवर आता स्टिकरही मिळत नाही, अरे कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा !, रोज डव्ह साबणाने अंघोळ करणारा अडमिन आज विम साबणाने अंघोळ करतोय, अरे कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा !, काल रात्रभर नीट झोपच नाही झाली, डोक्यात एकच विचार येत होता अरे कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा !, अरे महाराष्ट्र काय काड्यांची पेटी आहे, अरे कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा !, पूर्वी पोर फक्त फोन बोलण्यासाठी वापरायची आता दिवसभर व्हॉटस अपवर चॅटिंग करत्यात अरे कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा !, वडापाववर समाधान मानणारी गर्ल फ्रेंड आता बर्गर शिवाय काही खात नाही अरे कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा !, कॉल रेट वाढले म्हणून एसएमएस करू लागलो तर एसएमएसचे पॅक रेट वाढले जाऊ दे म्हणून व्हॉटस ॲप डाऊनलोड करतो तर तो नेट पॅकही वाढवून ठेवला अरे कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा !, हे पहा सगळीकडे बोंबाबोंब आहे महाराष्ट्र हरवल्याची ज्यांनी कोणी हरवला असेल त्यांनी ताबडतोब तो परत करा आम्हाला १५ तारखेला मतदान करायचे त्यानंतर कुठे न्यायचा तो न्या; पण सध्या अरे कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा !

Leave a Comment