हज यात्रेतील १०० रू. नोटेसाठी मोजले १.८० लाख

note
बंगलोर -कर्नाटक न्यूमिस्मेटिक सोसायटी आणि राजस्थान मरूधर आर्टस तर्फे बंगलोर येथे भरविण्यात आलेल्या दुर्मिळ नाणी आणि नोटांच्या प्रदर्शनात हज यात्रा करून आलेली १०० रूपयांची खास हिरवी नोट तब्बल १ लाख ८० हजार रूपयांत लिलावात विकली गेली. ई कॉमर्स ऑनलाईनवरच हा लिलाव केला गेला.

हज यात्रेला जाणार्‍यासाठी १९५३ ते १९७० या कालावधीत रिझर्व्ह बँक खास हिरव्या रंगाच्या विशेष नोटा छापत असे. यातील ही नोट असल्याचे समजते. या नोटेसाठी ग्राहकाने १लाख ८० हजार रूपये मोजले. लिलावात १९६४ मधील १ रूपयांच्या नोटांसाठी १० हजार रूपये तर १९६५ पूर्वी छापलेल्या १ रूपयांच्या गड्डीसाठी ७ ते ८ हजार रूपये तर १९७० साली प्रसिद्ध करण्यात आलेल्या १ रूपयाच्या विशेष नाण्यासाठी ८ हजार रूपये मिळाले असल्याचेही समजते. या लिलावात आज दुर्लभ असलेल्या अनेक नोटा आणि नाणी पाहायला मिळाली.

Leave a Comment