डाळ पुरी

dal-puri
हा खास राजस्थानी पदार्थ असून तो चविष्ट तर आहेच पण पोटभरीचाही आहे.
साहित्य – पुरीसाठी – दोन वाट्या कणीक, दोन चमचे दही, ओवा, मीठ
डाळीसाठी- मूग डाळ पाऊण वाटी, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, १ बोटभर आले तुकडा, कोथिबीर आवडीनुसार, धने पावडर, चवीनुसार मीठ व थोडी साखर
कृती- प्रथम मुगाची डाळ स्वच्छ धूवन दोन तास पाण्यात भिजत घाला. त्यानंतर डाळ निथळा व पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवा. नंतर त्यात हिरवी मिरची, आले घालून पाणी न घालता मिक्सरमध्ये वाटून घ्या. वाटलेल्या गोळ्यात जाड चिरलेली कोथिबीर, धने पावडर, थोडी साखर व मीठ घालून चांगले मिक्स करा.

डाळ वाटण्यापूर्वी कणकेत दही, मीठ व ओवा व गरम तेलाचे मोहन घालून आपण पुरीसाठी भिजवतो तशी घट्ट कणीक गरजेनुसार पाणी घालून भिजवा आणि अर्धा तास झाकून ठेवा. नंतर कणीक मळून त्याच्या पुरीसाठी छोट्या गोळ्या करून घ्या. पुरी लाटा व त्याच्यावर एका बाजूला वाटून ठेवलेले डाळीचे मिश्रण १ ते दीड चमचा पसरवा. तेल तापवा आणि तेल चांगले तापल्यावर डाळ लावलेली बाजू खालच्या बाजूला करून पुरी तेलात टाका. ही बाजू सोनेरी रंगावर तळली गेली की पुरी उलटून दुसर्‍या बाजूनेही खमंग तळून घ्या. या प्रकारे सर्व पुर्‍या तयार करा. हिरवी चटणी, गोड चटणी अथया टोमॅटो सॉसबरोबर गरमागरम सर्व्ह करा. मटार उसळ. बटाटा रस्सा याबरोबरही ही पुरी चांगली लागते.

Leave a Comment