५२९ कोटींवर पोहोचली ‘जन-धन’ योजनेतील खात्यांची एकूण संख्या

jan-dhan
नवी दिल्ली – पंतप्रधान जन-धन योजनेतंर्गत आत्तापर्यंत ५.२९ कोटी बॅंक खाते उघडण्यात आली असून १.७८ कोटी रुपे डेबिट कार्ड देखील जारी करण्यात आले आहेत. वित्त मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या एका अधिकृत निवेदनानुसार, एक ऑक्टोबरपर्यंत जन-धन योजनेतंर्गत देशात ५.२९ कोटी बॅंक खाती उघडण्यात आली आहेत. यांपैकी ३.१२ कोटी खाती ग्रामीण भागात तर २.१७ कोटी बॅंक खाती शहरी भागातील आहेत. या खात्यांपैकी १.७८ कोटी खाते रुपे कार्डशी संलग्न आहेत. या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, अभियान संचालक व अतिरिक्त अभियान संचालक यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका तसेच ऍक्सिस बॅंक, एचडीएफसी बॅंक, आयसीआयसीआय बॅंक आणि इंडसइंड बॅंक यांसारख्या खासगी बॅंकांच्या कार्यकारी संचालकांशी जन-धन योजनेचा आढावा घेतला. या योजनेतंर्गत प्रत्येक कुटुंबाचे किमान एक खाते बॅंकेत असावे, असे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

Leave a Comment