१७,९९९ रुपयांत मोटोरोलाचे स्मार्टवॉच

smart-watch
नवी दिल्ली – मोबाईल कंपनी मोटोरोलाने ‘मोटो ३६०’ या स्मार्टवॉचची भारतामध्ये विक्री सुरू केली असून ग्राहकांना हे स्मार्टवॉच खरेदीसाठी केवळ ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टवर उपलब्ध करण्यात आले असून त्याची किंमत १७,९९९ रुपये एवढी आहे.

या स्मार्टवॉचमध्ये ‘व्हाइस कंट्रोल’ची सुविधा देण्यात आली आहे. यामधून मेसेज पाठवणे, रिमाइंडर सेट करणे, हवामानाची स्थिती आणि दिशादर्शनाची माहिती घेता येते. याबरोबरच युझर्सना पावले आणि हृदयाचे ठोके यांची अचूक माहिती मिळते. यासाठी यामध्ये पेडोमीटर आणि हार्ट रेट मॉनिटर ही सुविधा देण्यात आली आहे. अँड्रॉइड ४.३ किंवा त्यापुढच्या व्हर्जनच्या स्मार्टफोनवर हे घडय़ाळ चालू शकत असून त्यात अँड्रॉइड वेअर ऑपरेटिंग सिस्टीम आहे. याबरोबरच १.५ इंच डिस्प्ले, ३२० एमएएचची बॅटरी, ५१२ एमबी रॅम आणि ४ जीबी इंटरनल स्टोअरेज ही आणखी काही वैशिष्ट म्हणता येतील.

Leave a Comment