
मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, विधानसभा निवडणुकीत आम्ही बहुमत मिळवून सत्तेवर आल्यास कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आणू…याशिवाय बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी बांधकाम व्यावसायिकांना दिलेली मंजुरीबाबत चौकशी करण्यात येईल, असेही ते म्हणाले. एकेकाळी कॉंग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चांगले मैत्रिपूर्ण संबंध होते. मात्र, आता ते एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. तसेच सिंचन घोटाळ्याप्रकरणी चौकशी झाली असती तर अजित पवारांची जयललिता झाली असती, अशी टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
शिवसेना सत्तेवर आल्यास भ्रष्टाचार उघडकीस आणेल – उद्धव ठाकरे
सत्तेत आल्यानंतर बाळासाहेबांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बनविण्याची देखील उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली आहे. दसऱ्याच्या दिवशी शिवाजीपार्कमध्ये रंगणार शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा आरोपप्रत्योरापातच गेला. उत्तर मुंबईतल्या शिवसेनेच्या उमेदवारांसाठी बोरीवलीत सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. महायुतीच्या तुटण्यामागे भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांचा अहंकाराच कारणीभूत असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. अच्छे दिन आल्यावर मित्रपक्षांची साथ सोडली. ज्यांना आम्ही साथ दिली, त्यांनी आम्हाला लाथ दिली, अशी टीका देखील उद्धव यांनी भाजपवर केली.
