लीबियात बॉम्ब हल्ला आणि झडप; ३६ सैनिक ठार

libya
बेनगाजी – लीबियातील बेनगाजी विमानतळावरील बॉम्ब हल्ल्यादरम्यान लष्करी प्रशिक्षण घेतलेल्या इस्लामी आणि सुरक्षा दलांमध्ये झडप झाल्याने अनेक जवान ठार झाले आहेत. याघटनेत ७० हून अधिक जण जखमी झाले आहेत. यादरम्यान लीबीयावर निर्बंध लादण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. लीबियाच्या विशेष शक्ती एककाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार नुकतेच झालेल्या तीन कार बॉम्ब हल्ल्यानंतर सुरक्षा दल आणि इस्लामिक यांच्यामध्ये झडप झाली. यामध्ये ३६ सैनिक ठार झाले होते. ते म्हणाले की, सैन्यांचा एक ताफा विमानतळाजवळून जात असता विस्फोटक पदार्थांनी भरलेल्या दोन कारमध्ये स्फोट झाला. काहीवेळानंतर त्याचठिकाणी तीसरा बॉम्ब हल्ला झाला. दरम्यान लीबियात अनेक वर्षांपासून शासन करणारा नेता मुअम्मर गद्दाफी याच्या नाटोच्या बंडखोरीत मारले गेलेल्या तीन वर्षानंतरही देशामध्ये हिंसाचार थांबलेले नाही.

Leave a Comment