चीन ओपन टेनिस : एंडी मरेला मात देत जोकोविच अंतिम फेरीत !

novan
बिजिंग – जगातील अव्वल मानांकीत नोवाक जोकोविचने एंडी मेरेला सरळ सेटमध्ये ६-३, ६-४ ने मात देत, चीन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. चीन ओपनमध्ये जोकोविचचा हा सलग २३ वा विजय आहे. तर, या दरम्यान त्याने एकही सामना गमाविलेला नाही. वर्षाच्या पाचव्या खिताबावर लक्ष असलेला जोकोविच अंतिम सामन्यात तिसरा मानांकीत टॉमस बर्डिच आणि मार्टिन क्लिजान यांच्यात होणा-या उपांत्य सामन्यातील विजेत्यासोबत भिडणार आहे. बर्डिच आणि क्लिजान यांच्यात कडवी झुंज पहायला मिळण्याची शक्यता आहे.

क्लिजानने शुक्रवारी राफेल नदालला मात देत, त्याला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखविला होता. पहिल्या उपांत्य सामन्यात ब्रिटेनच्या एंडी मरे डिफेंडिंग चॅम्पियन जोकोविचच्या समोर जास्त वेळ टिकाव धरू शकला नाही. जोकोविचचा चीन ओपनच्या अंतिम फेरीत शानदार रिकॉर्ड राहिला आहे. त्याने २०१३ च्या अंतिम सामन्यात राफेल नदालला ६-३, ६-४ ने हरविले होते. २०१२ मध्ये त्याने विल्फ्रेड सोंगाला ७-६ (७-४), ६-२ ने मात देत, खिताब आपल्या नावावर केला होता. २०१० मध्ये त्याने डेविड फेररला ६-२, ६-४ ने मात दिली होती आणि २००९ ने हरविले होते आणि २००९ मध्ये त्याने मार्टिन सिलिकला ६-२, ७-६, (७-४) ने हरविले होते.

Leave a Comment