आशियाई खेळातील क्रिकेटचे सुवर्णपदक श्रीलंकेने पटकाविले

srilanka
इन्चॉन – इन्चॉन येथे सुरु असलेल्या १७ व्या आशियाई खेळांमध्ये क्रिकेटचे सुवर्णपदक श्रीलंकेने पटकाविले आहे. सुवर्णपदकासाठीच्या या सामन्यात श्रीलंकन संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १३३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानचा संघ १७.४ षटकांत ६५ धावांवरच गारद झाला. श्रीलंकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज जीवन मेंडिसने १३ धावा देत तीन गडी बाद केले. तर इसुरु उडाना आणि चतुरंग डिसिल्व्हा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. पुढील वर्षी ऑस्ट्रलिया आणि न्यूझीलंड येथे होणार्‍या विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार्‍या अफगाणिस्तान संघातील आठ फलंदाजांना या सामन्यात दुहेरी धावसंख्या करणे देखील जमले नाही. श्रीलंकेने यापूर्वी २००२ साली बुसान येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. त्यानंतरचे त्यांचे या स्पर्धेतील हे पहिलेच सुवर्णपदक आहे.

Leave a Comment