आठ पाकिस्तानी गोलंदाजांच्या संदिग्ध ऍक्शनचे होणार चाचणी

pcb
कराची – संदिग्ध गोलंदाजी ऍक्शनसाठी कमीतकमी आठ गोलंदाजांना पाकिस्तान क्रिकेट बार्ड (पीसीबी) च्या समितीमार्फत पुढील आठवड्यात राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत चाचणी करण्यास सांगण्यात आले आहे. त्यात राष्ट्रीय संघातील एकही खेळाडू सामिल नाही. पीसीबीने सांगितले की, जलदगती गोलंदाज अताउल्लाह याची पहिलेच तपासणी झाली आहे. तर, सोहेब मकसूद संयुक्त अरब अमीरात (यूएर्इ) येथून परतेल, तेव्हा त्याच्या ऍक्शनची तपासणी करण्यात येणार आहे. तो आता ऑस्ट्रेलिया विरूद्ध निर्धारित षटकांच्या मालिकेत पाकिस्तान संघाकडून खेळत आहे. या सर्व गोलंदाजांना कराचीत नुकत्याच राष्ट्रीय टी-२० स्पर्धेदरम्यान सामना अधिका-यांनी संदिग्ध गोलंदाजी ऍक्शनसाठी अहवाल केला होता. जुनैद जिया एक जलदगती गोलंदाज आहे, त्याला वगळता अन्य सर्व गोलंदाज फिरकीपटू आहेत, ज्यांना परिक्षणासाठी बोलाविण्यात आले आहे. त्यात नायर अब्बास, उस्मान मलिक, खुर्रम शहजाद, फराज अहमद खान, जहांजेब खान, मुजम्मल तहसीन आणि नदीम जावेद सामिल आहेत.

Leave a Comment