
परभणी – रिपल्बिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यासारखी माणसे पाऊस असो अथवा नसो बेडकासारख्या इकडून तिकडे उड्या मारत असतात, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आठवलेंवर केली आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे मनसे उमेदवाराच्या प्रचाराचा शुभांरभ राज य़ांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
आठवलेंसारखी माणसे बेडकासारख्या उड्या मारत राहतात – राज ठाकरे
आठवलेंसारखे नेते कुठेही काहीही झाले की, प्रथम बाबासाहेबांचेनाव घेतात. दलित जनतेवर अन्याय झाल्याची ओरड करत आपली दुकानदारी चालवतात, असे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय आठवलेंना म्हणे बिग बॉस मध्ये स्पर्धेक म्हणून सहभागी व्हायचे होते. अहो…तिथे हे उघडे फिरले म्हणजे काय करायचे. खऱंच तर ज्यांना काम नाहीत अशी व्यक्ती बिग बॉसमध्ये जातात. त्यामध्ये य़ांची एक भर, असेही राज यांनी म्हटले आहे. आयुष्यात या माणसाने कधीही कोणत्या समस्येवर चर्चा केली नाही. कधी विचार केला नाही अशा शब्दात आठवलेंवर टीका केली
