बारामती न्यायालयाने सुरू केली अजित पवारांची चौकशी

ajit-pawar
पुणे – लोकसभा निवडणुकीवेळी मासळवाडी येथे भाषण करताना सुप्रिया सुळेंना मतदान न केल्यास २३ गावांचे पाणी बंद करू, असे धमकीवजा वक्तव्य केल्याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्हाधिकारी, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक यांनी क्लीन चिट दिली होती. पण त्यांची चौकशी बारामती न्यायालयाने सुरू केली आहे. अशी माहिती माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पवारांच्या १६ एप्रिल रोजीच्या भाषणाची चित्रफीत आपल्याकडे असून ती न्यायालयात चार नोव्हेंबर रोजी सुनावणीवेळी सादर करणार आहोत. पवारांनी मतदारांना दमबाजी करून पाणी बंद करून शेतक-यांचे आर्थिक नुकसान केल्याची तक्रार आपण वडगाव निंबाळकर चौकीत तक्रार दाखल केली, असे खोपडे यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment