हज यात्रेसाठी जमले २० लाख यात्रेकरू

hajj
मीना – मुस्लीम धर्मियांच्या पवित्र हज यात्रेसाठी यंदा जगभरातून २० लाख भाविक सौदी अरेबियात दाखल झाले आहेत. त्यात १ लाख ३६ हजार भारतीय नागरिकही आहेत. केंद्रीय हज समितीचे प्रमुख प्रिन्स मिसाल यांनी दिलेल्या माहितीनुसार यात्रेकरूंना सुविधा पुरविण्यासाठी सौदी सरकारने अब्जावधी रूपये खर्च केले आहेत. सुरक्षा व व्यवस्थापनासाठी ७० हजार अधिकारी रात्रंदिवस तैनात आहेत.

या यात्रेला यंदा बांग्ला देशचे राष्ट्रपती मुहम्मद अब्दुल हमीद, सुदानचे उमर बशीर, सोमालियाचे हसन शेख मुहमूद आणि मालदिवचे अब्दुल्ला यमीन हेही आले असून आज सकाळपासूनच सौदीतून मीना शहराकडे भाविक रवाना होऊ लागले आहेत. ही यात्रा पाच दिवस चालणार आहे.

Leave a Comment