
मुंबई – यंदाच्या विधानसभा निवडणुका पंचरंगी आणि कांही ठिकाणी बहुरंगी होत असल्याने कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे सांगणे अवघड बनले असल्यचे तज्ञांचे मत आहे आणि निवडणक तज्ञांच्या मते महाराष्ट्राची धुरा कुणाकडे जाणार याचा निर्णय राज्यातील गोल्डन ट्रँगल समजला जाणारा भाग ठरवेल. मुंबईसह कोकण, पुणे परिसर आणि नाशिकपर्यंतचा हा भाग गोल्डन ट्रँगल म्हणून ओळखला जातो कारण या भागात शहरांचे प्रमाण अधिक आहे.
महाराष्ट्राचे भवितव्य ठरविणार गोल्डन ट्रँगल
आजपर्यंतचे आकडे असे सांगतात की या भागातून ज्यांना अधिक जागा मिळाल्या त्यांचे सरकार सत्तेत आले. परिणामी सर्वच पक्षांनी या भागावर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. पाच जिल्हे, १४ लोकसभा मतदारसंघ असलेल्या या भागात विधानसभेचे ७७ मतदारसंघ आहेत. शहरी भाग अधिक प्रमाणात असलेल्या या भागात मुंबई आणि परिसरात ६३, पुणे आणि परिसरातील १० तर नाशिक परिसरातील ४ जागा आहेत.
