अफजल खानाची कबर आहे त्या स्थितीत राहणार

afzal-khan
मुंबई – राज्य सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफजल खानाची कबर पाहण्यासाठी पर्यटकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता, पण आता मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द ठरवला असून न्या. ओक यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला यासंदर्भात सर्वांची मते जाणून कायद्यानुसार नव्याने निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले आहे.

राज्य सरकारने २००७ मध्ये कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नामुळे कबर पर्यटकांसाठी बंद केली होती. ही ऐतिहासिक वास्तू पर्यटकांना पाहण्यास खुली करण्यात यावी, अशी विनंती करणारी जनहित याचिका फरीद डावरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर न्या. अभय ओक आणि न्या. कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

Leave a Comment