भारतीय महिला कबड्डी संघ अंतिम फेरीत

kabbadi
इंचेऑन : आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीच्या मैदानात भारतीय महिला संघाने कमाल केली. महिलांच्या संघाने सेमीफायनलमध्ये थायलंडचा ४१-२८ असा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केल्यामुळे भारताचे रौप्य पदक निश्चित झाले आहे.

पहिल्या हाफमध्ये दोन्ही देशांचे संघ १४-१४ असे बरोबरीत होते. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये भारताच्या महिलांनी शानदार कामगिरी करत २७ गुण मिळवले, तर प्रतिस्पर्धी संघाला १४ गुण मिळवता आले. या सामन्यात भारतीय संघाला पहिल्या हाफमध्ये दोन तर दुसऱ्या हाफमध्ये चार बोनस गुण मिळवता आले. मात्र थायलंडला पहिल्या हाफमध्ये सात आणि दुसऱ्या हाफमध्ये सहा गुण मिळाले. याआधीच्या सामन्यात भारतीय महिला संघाने यजमान दक्षिण कोरियाला ४५-२६ असे पराभूत करुन अंतिम चारमध्ये जागा मिळवली. तर पहिल्या सामन्यात बांग्लादेशला पराभवाची धूळ चारली.

Leave a Comment