बैलगाडी, टांगाचालकांनाही द्यावी लागणार चालक परिक्षा

cart
कोटा – रस्त्यावरून टांगा, बैलगाड्या अथवा तत्सम प्राण्यांच्या गाड्या चालविणार्‍यानाही यापुढे विशेष परिक्षा द्यावी लागणार आहे. रोड अॅन्ड ट्रान्स्पोर्ट सेफ्टी बिल साठी जो नवा ड्राफ्ट बनविला गेला आहे त्यात या सदर्भातली माहिती समाविष्ट करण्यात आली आहे. स्वयंचलित वाहने चालविताना ज्या प्रमाणे चालकाला परिक्षा घेऊन परवाना दिला जातो तसेच प्रमाणपत्र परिक्षा घेऊन या गाडीवानांना दिले जाणार असल्याचे समजते.

विशेष म्हणजे गाडीवानाला त्याची गाडी भाड्याने चालवायला देता येणार नाही. नवीन नियमानुसार गाडीवानांसाठी शेड्युल ए परवाना दिला जाणार असून त्यात ९ प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे. प्रमाणपत्र मिळविण्यासाठी गाडीवानाला जिल्हा परिवहन कार्यालयात दोन तासांची परिक्षा द्यावी लागणार आहे. त्यात तोंडी आणि प्रात्यक्षिक अशा परिक्षांचा समावेश आहे. तोंडी परिक्षेत वाहतूक नियम, सिग्नल, ट्रॅफिक लाईट या संदर्भातले प्रश्न असतील तर प्रात्यक्षिकात गाडीला जुंपलेले जनावर मालकाच्या किती ताब्यात आहे याची परिक्षा घेतली जाणार आहे. म्हणजे मालकाच्या आज्ञेनुसार थांबणे, चालणे, बसणे आदि क्रिया जनावर करू शकते वा नाही हे पाहिले जाणार आहे.

नव्या ड्राफ्टनुसार दुचाकी वाहन व्यावसायिक कारणासाठी वापरले जाणार असेल तर वाहन चालकाचे वय किमान २० वर्षे असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Leave a Comment