भारतीय वंशाचे अँटोनियो कोस्टा पोतुर्गाल पंतप्रधानपदाचे उमेदवार

antinia
मूळ गोव्याचे असलेले भारतीय वंशाचे अँटोनियो कोस्टा पोर्तुगालच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सोशालिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून निवडले गेले आहेत. पोर्तुगालमध्ये पुढील वर्षात निवडणुका होत आहेत. सध्या सोशालिस्ट पक्ष पोर्तुगालमध्ये प्रमुख विरोधी पक्ष आहे.

५३ वर्षीय कोस्टा अतिशय साध्या राहणीमुळे लिस्बनचे गांधी म्हणून ओळखले जातात. ते मूळचे गोव्याचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील प्रसिद्ध लेखक होते. त्यांनी रविंद्रनाथ टागोर यांच्यावर निबंध लिहिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सोशालिस्ट पक्षात पंतप्रधानपदाचे उमेदवार पदासाठी झालेल्या निवडणुकीत कोस्टांनी सेगुरो यांचा पराभव केला. सोशालिस्ट पक्षाचा निवडणुकीत विजय झाला तर कोस्टा यांचे पंतप्रधानपद नक्की असल्यासारखे आहे. जनमत चाचण्यातून पोर्तुगालमध्ये सोशालिस्ट पक्षाचा विजय होईल असे अंदाज वर्तविले गेले आहेत.

कोस्टा लिस्बनमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. सोशालिस्ट पक्षाचे सरकार सत्तेवर होते तेव्हा त्यांनी न्याय व गृहमंत्रीपद भूषविले आहे. सत्तेवर आल्यास भारताबरोबर व्यापार संबंध वाढविण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.

Leave a Comment