फेसबुकचा बादशहा घेणार मोदींची भेट

mark
दिल्ली : सर्वात तरूण अब्जाधीश आणि फेसबुकचा बादशहा अशी ओळख असलेला मार्क झुकेरबर्ग भारतात ९ आणि १० ऑक्टोबरला होणा-या इंटरनेट डॉट ओआरजी संमेलनात झुकेरबर्ग सहभागी होण्यासाठी येणार असून या दरम्यान तो दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

जुलै महिन्यातच फेसबुकचे कार्यकारी अधिकारी श्रेयल सँडबर्ग यांनी जगातील दुसऱया क्रमांकाची बाजारपेठ असलेल्या भारताला भेट दिली होती.

इंटरनेटचा वापर जगभरातील लोकांसाठी व्हावा, असे इंटरनेट ओआरजी संमेलनाचे लक्ष्य असून पाच अब्ज लोकांना इंटरनेट ऍक्सेसशिवाय ऑनलाईन येण्यास सक्षम करणे, यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या संमेलनात फेसबुकसह मेडियटेक, नोकिया, ऑपेरा, क्वालकॉम आणि सॅमसंग कंपनीचे संस्थापकदेखील हजेरी लावणार आहे. कमी किमतीचे आणि उच्च दर्जाचे स्मार्टफोन विकसित करून लोकांना इंग्रजीसह इतर भाषादेखील उपलब्ध करून देण्याकडे या संमेलनात चर्चा होणार आहे.

या दौ-यादरम्यान मोदी आणि झुकेरबर्ग यांच्या भेटीत भारतीय सरकारच्या कामकाजात, निवडणुकीत फेसबुकचा कसा अधिकतम वापर होऊ शकतो, यावर चर्चा होणार आहे.

Leave a Comment