आयफोन सिक्सची चीनमध्ये १७ आक्टोबरपासून विक्री

iphone
अॅपलने चीन सरकारने नोंदविलेले युजर सुरक्षा विषयक आक्षेप दूर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांच्या आयफोन सिक्स आणि आयफोन प्लसची विक्री १७ आक्टोबरपासून सुरू केली जात असल्याचे जाहीर केले आहे. हे दोन्ही फोन १० देशात १९ सप्टेंबरला लाँच केले गेले होते मात्र त्यावेळी ते मेन लँड चायनामध्ये लाँच होऊ शकले नव्हते.

मिळालेल्या माहितीनुसार गतवर्षी अॅपलने त्यांचे आयफोन फाईव्ह एस व सी चीनसह ११ देशांत एकाचेवळी लाँच केले होते. मात्र अॅपलच्या आयओएस ऑपरेटिंग सिस्टीममुळे युजरची वैयक्तीक माहिती किवा डेटा लिक होण्याचा धोका असल्याचा आक्षेप चीनच्या नियामक मंडळाने घेतला होता व त्यामुळे आयफोन सिक्स व प्लस चीनमध्ये लाँच होऊ शकले नव्हते. अॅपलने युजर सुरक्षा अपग्रेड करण्यास मान्यता दिल्यानंतर आता हे फोन विक्रीसाठी येऊ शकणार आहेत. अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी चीनच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

यूएस नंतर अॅपलसाठी ग्रेटर चायना ही दोन नंबरची मोठी बाजारपेठ आहे. ग्रेटर चायना मध्ये हाँगकाँग व तैवानचा समावेश होतो. चीनमध्ये आयफोन सहाच्या विक्रीसाठी परवानगी दिली गेली नव्हती मात्र हे दोन्ही फोन काळ्याबाजारात विकले जात होते. १ हजार ते १३०० डॉलर्स अशी त्यांची किमत होती . मात्र आता खुल्या बाजारात हे फोन मिळणार असल्याने चीनी ग्राहकांनीही समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Comment