अमेरिका दौरा आटोपून पंतप्रधान मायदेशी रवाना

modin
वॉशिंग्टन- अमेरिकन वेळेप्रमाणे बुधवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचा दौरा पुरा करून भारताकडे रवाना झाले आहेत. पाच दिवसांचा हा दौरा अत्यंत यशस्वी ठरल्याचे विदेश मंत्रालयाकडून सांगितले जात आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि मोदी यांच्यात काल व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होऊन कांही निर्णय घेतले गेले. त्यात व्यापार वाढ, सेवा क्षेत्रासाठी अमेरिकेकडून सवलती, अमेरिकन कंपन्यांना भारतात व्यवसाय वाढीसाठी परवानग्या, रक्षा करारात १० वर्षांची वाढ, सुरक्षा समझोता, प.आशिया व अफगाणिस्तानातील दहशतवादाचा धोका, इस्लामिक स्टेट चा धोका निपटून काढण्यासाठी दोन्ही देशांत सहकार्य अशा अनेक मुद्दयांचा समावेश होता.

अमेरिका भारतात अजमेर, अलाहाबाद आणि विशाखापट्टणम येथे स्मार्टसिटी निर्मितीसाठी सहकार्य करणार असल्याचेही समजते. मोदी आणि ओबामा या दोन्ही नेत्यांनी प्रतिष्ठित वॉशिग्टन पोस्ट वृत्तपत्रात एकत्रितपणे संपादकीय लिहून भारत अमेरिकेतील सामंजस्य जगाला दीर्घकाळ शांतता मिळवून देण्यास उपयुक्त ठरेल असा आशावाद व्यक्त केला आहे.

Leave a Comment