अंजली दमानियांचा आम आदमी पक्षाचा राजीनामा

anjali
स्थापनेपासून खूप चर्चेत आलेल्या आणि त्यापाठोपाठ अनेक नेत्यांनी सोडचिठ्ठी दिलेल्या आम आदमी पक्षाचा महाराष्ट्राच्या पक्ष संयोजक अंजली दमानिया यांनीही राजीनामा दिला आहे. त्यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र कार्यकारणी कमिटीला लिहिलेल्या पत्रात कांही वैयक्तीक कारणांमुळे त्या पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. मात्र आपले हृदय नेहमी पक्षासोबतच राहील असेही दमानिया यांनी म्हटले आहे.

अंजली दमानिया यांच्यासोबत महाराष्ट्राच्या पक्ष सचिव प्रीती शर्मा मेनन यांनीही त्यांच्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला आहे. यामुळे अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठाच झटका बसला आहे. यापूर्वीही शाजिया इल्मी यांच्यासह अनेक मुख्य नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.

Leave a Comment