आर्कुटला फेसबुक ट्विटरवर श्रद्धांजली

orkut
अवघ्या १० वर्षाच्या आयुष्यानंतर मरणावस्थेत गेलेल्या गुगलच्या आर्कुट साईटला अनेक जुन्या युजर्सनी श्रद्धांजली वाहिली आहे. फेसबुक आणि ट्विटरवर ही श्रद्धांजली वाहिली गेली असून आर्कुटमुळे मिळालेल्या आनंदाचा त्यात उल्लेख करण्यात आला आहे. गुगलने सर्वप्रथम सुरू केलेली ही सोशल नेटवर्क साईट आजपासून बंद झाली आहे.

ही साईट आजपासून बंद होत असली तरी जुने युजर्स त्यांचा प्रोफेशनल डेटा, पोस्टस, फोटोचे बॅकअप आणखी दोन वर्षे म्हणजे सप्टेंबर २०१६ पर्यंत घेऊ शकणार आहेत मात्र आता कुणालाही या साईटवर नवीन अकौंट उघडता येणार नाही. भारतात फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल नेटवर्क साईट येण्यापूर्वी आर्कुट फारच लोकप्रिय होती. गुगलने ही साईट बंद होण्यामागे त्यांच्याच यूट्यूब, ब्लॉगर, गुगल प्लसला जबाबदार धरले आहे. या साईटची लोकप्रियता अधिक वाढल्याने आर्कुट कांहीशी मागे पडल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

या क्षेत्रातील जाणकारांनी फेसबुकची मरणघटिकाही जवळ आल्याचे भाकित वर्तविले आहे. तज्ञांच्या मते फेसबुकचाही युजर लवकरच मोठ्या संख्येने निरोप घेतील. प्रिन्स्टन विद्यापीठातील संशोधकांच्या मते २०१७ पर्यंत अनेक फेसबुक युजर साईटला कंटाळल्यामुळे तिचा निरोप घेतील आणि फेसबुकची मरणघटिका जवळ येत जाईल. सध्या फेसबुकचे जगभरात १.२ अब्ज अॅक्टिव्ह युजर आहेत.

Leave a Comment