आगामी काळात फ्लिपकार्टचा आयपीओ येणार

flipkart
मुंबई – भारतातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने येत्या तीन ते पाच वर्षात कंपनी त्यांचा आयपीओ आणत असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीचे सीईओ सचिन बन्सल यांनी ही माहिती दिली.

बन्सल म्हणाले की आम्ही कंपनी केवळ नफा मिळवावा या उद्देशाने सुरू केलेली नाही. आमचा मुख्य फोकस एरिया मोबाईल, सर्व्हीस आणि तंज्ञत्रान हाच आहे.कोणत्याही ई कॉमर्स कंपनीसाठी टेक्नॉलॉची हा मुख्य फोकस असतोच. भारतात अजून ई कॉमर्स बाल्यावस्थेतच आहे. येथे केवळ २ ते ३ टक्के नागरिकच ऑनलाईन शॉपिंग करतात. मात्र भारतात व्यवसाय वाढीची संधी खूपच मोठी आहे.

Leave a Comment