सावनेरमध्ये सोनबा मुसळे यांचा अर्ज बाद

bjp1
नागपूर – भाजपला नागपूरमधील शासकीय कामाचे कंत्राट घेतल्याने सावनेरच्या भाजप उमेदवार सोनबा मुसळे यांची उमेदवारी अर्ज निवडणूक अधिका-यांनी रद्द केला.

मुसळे कन्स्ट्रक्शमध्ये सोनबा मुसळे हे भागीदार असून त्यांच्या कंपनीने शासकीय कामाचे कंत्राट घेतल्याचा आरोप मनीष मोहोड यांनी केला होता. मुसळे यांनी शासकीय कंत्राट घेतल्याने त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी मोहोड यांनी केली होती.

निवडणूक अधिका-यांनी आरोपांची शहानिशा केल्यानंतर मुसळे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करत असल्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे भाजपला सावनेरमध्ये फटका बसणार असून, पर्यायी भाजप येथे कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार ते अजून स्पष्ट झालेले नाही.

Leave a Comment