महाराष्ट्रात काँग्रेस प्रचारासाठी नगमा येणार

nagma
मुंबई – आघाडीत बिघाडी झाल्यानंतर स्वबळावर राज्यातील विधानसभा लढत असलेल्या काँग्रेसच्या प्रचारासाठी दक्षिणेतील अभिनेत्री नगमा येणार असल्याचे समजते. काँग्रेसने राज्यात प्रचारासाठी १० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून त्यात सोनिया, राहुल, माजी पंतप्रधान मनमोहनसिग, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्दरामैय्या, माजी क्रिकेटपटू खासदार अझरूद्दीन, महासचिव दिग्विजयसिंग, नगमा, ज्योतिरादित्य सिंदिया, कमलनाथ यांचा समावेश आहे.

याशिवाय आणखी ४० महत्त्वाचे नेतेही प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत. त्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, उद्योगमंत्री नारायण राणे, पतंगराव कदम, विश्वजीत कदम, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखेपाटील, हिंदी मराठी चित्रपट अभिनेता राकेश राजपूत यांचा समावेश आहे. महाराष्ट्रत पंचरंगी लढती होणार असल्याने काँग्रेसला कांही ठिकाणी चांगला फायदा मिळण्याची आशा आहे.

Leave a Comment