जयललितांना शिक्षा अन १६ जणांचा मृत्यू

jaylalta
चेन्नई – तमीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना ज्ञात स्त्रोतांपेक्षा अधिक मालमत्ता जमविल्याप्रकरणी न्यायालयाने सुनावलेली शिक्षा ऐकून १६ जणांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिसांकडून समजते. जयललिता यांना शिक्षा झाल्याचा धक्का बसून १२ वीतील विद्यार्थीनीसह सहा जणांनी आत्महत्या केल्या तर १० जणांना हे वृत्त ऐकून धक्का बसल्याने हृदयविकाराचा झटका आला व त्यात त्यांचा मृत्यू झाला. राज्यात अनेक नागरिकांना या वृत्ताचा धक्का बसल्याने रूग्णालयात हलवावे लागले. तिरूपूर येथील एकाने हाताचे बोट कापून टाकले .

विशेष म्हणजे जयललिता यांच्या जागी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पेन्नीरसिल्वम यांनाही अश्रू आवरेनात. त्यांनी अक्षरशः ओक्साबोक्शी रडत शपथ घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोर्टाचा जयललितांबाबतचा निकाल जाहीर होताच तीन जणांनी फास लावून आत्महत्या केली, एकाने जाळून घेतले, एकाने बसखाली जीव दिला तर एकाने विष पिऊन आत्महत्या केली.