स्मार्ट सिटी प्रकल्पात गुंतवणुकीची अमेरिकन कंपन्यांची तयारी

smartcity
भारतातील सर्व कुटुंबाना २०२२ पर्यंत स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी आखल्या गेलेल्या अनेक योजनांतील एक योजना म्हणजे देशभरात १०० स्मार्टसिटी बनविणे. अमेरिकेतील बड्या कंपन्या गुगल, आयबीएम, एडोब, कॉग्निझंट यांनी भारतातील स्मार्टसिटी योजनेत गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली असून या कंपन्या डिजिटल इंडिया प्रोजेक्टमध्येही गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचे वृत्त आहे.

या कंपन्यांबरोबरच अन्य अमेरिकन जायंट कंपन्यांनीही भारतातील विविध क्षेत्रातील प्रकल्पात गुंतवणुक करण्याची तयारी दर्शविली असून त्यात पेप्सिको आणि कन्झ्यमर प्रॉडक्ट क्षेत्रातील अनेक प्रमुख कंपन्यांचाही समावेश आहे. या कंपन्या प्रामुख्याने स्वच्छ भारत संदर्भातील प्रकल्पात गुंतवणुकीसाठी उत्सुक असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment