आबांचा उमेदवारी अर्ज वैध

patil
सांगली : छाननीनंतर उमेदवारी अर्ज वैध असल्याचे स्पष्ट झाल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री आर आर पाटील यांना दिलासा मिळाला आहे. मात्र याची अधिकृत घोषणा झालेली नाही.

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून आर आर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात बेळगावमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याचा उल्लेख नसल्याचे सांगत भाजप कार्यकर्त्यांनी आक्षेप नोंदवल्यामुळे अधिकाऱ्यांनी आबांचा उमेदवारी अर्ज तूर्तास बाजूला ठेवला होता.

उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर आज छाननी सुरु आहे. मात्र छाननीनंतर आर आर पाटील यांचा उमेदवारी अर्ज वैध असल्याचं स्पष्ट झाले आहे.

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातून अजित घोरपडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यात भाजपने घेतलेल्या आक्षेपामुळे तासगावात राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता होती. मात्र आता आबांना दिलासा मिळाला आहे.