मेक इन इंडिया- मेड इन चायना अजब योगायोग ?

makeininda
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका वारीवर रवाना होण्यापूर्वी महत्वाकांक्षी मेक इन इंडिया मोहिमेची सुरवात करून गेले. भारतासह एकाचवेळ अनेक देशांत ही मोहिम सुरू केली गेली आणि या मोहिमेला बड्या भारतीय उद्योजकांबरोबरच विदेशातील उद्योजकांनीही चांगला प्रतिसाद दिला. भारताच्या या मोहिमेला उत्तर म्हणून चीन सरकारने याच दिवशी मेड इन चायना मोहिम जाहीर केली. मात्र भारताच्या मेक इन इंडियाच्या डिजिटल प्रोग्रामवर मेड इन चीनचे वर्चस्व राहिल्याचा अनोखा योगायोग घडला.

मिळालेल्या माहितीनुसार भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनविण्याच्या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंग मोदींनी केला खरा मात्र या प्रोग्रामचे इलेक्ट्रोनिक व्हर्जन ज्या पेन ड्राईव्हमध्ये लोड केले गेले तो पेन ड्राईव्ह मेड इन चायना होता. भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनविण्यात भारतासमोर तगडे आव्हान आहे चीनचे. इलेक्ट्रोनिक मॅन्युफॅक्चरसह अनेक कार्यक्रम सुरू केल्याची घोषणा पंतप्रधानांनी आत्तापर्यंत केली आहे मात्र त्यातील सर्वात मोठा कार्यक्रम मेक इन इंडिया हाच आहे. या कार्यक्रमांतर्गत भारतात बनलेली उपकरणे २५ हून अधिक सेक्टर्ससाठी वापरली जाण्याची योजना आखली गेली आहे आणि हाच प्रोग्रॅम मेड इन चायना पेन ड्राईव्ह मध्ये असावा हा खरंच योगायोग की आणखी कांही?