आशियाई स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारताला आणखी एक रौप्यपदक

incheon
इंचेऑन – भारताच्या खुशबीर कौरने इंचेऑन येथे सुरु असलेल्या १७ व्या आशियाई स्पर्धेच्या नवव्या दिवशी भारताला दिवसातील पहिले रौप्यपदक मिळवून दिले. २० किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत तिने रौप्यपदक मिळवले त्यासोबतच तिने नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.

एक तास ३३ मिनिटे आणि सात सेकंदात हा नवा विक्रम अमृतसरच्या २१ वर्षीय खुशबीरने प्रस्थापित केला. याआधी एक तास ३३ मिनिटे आणि ३७ मिनिटांचा तिचा स्वत:चा विक्रम तिने मोडीत काढला. या स्पर्धेत चीनच्या लू झिगुझीने २० किलोमीटरचे अंतर एक तास ३१ मिनिटे आणि सहा सेंकदात पूर्ण करत सुवर्णपदक मिळवले.

१८ किलोमीटरपर्यंत खुशबीर तिस-या स्थानावर होती. पुढच्या दोन किलोमीटरमध्ये चांगली कामगिरी करत दुस-या स्थानावर असलेल्या चीमच्या निए जिंगजिंगला पाठी टाकले. याआधी २०१२ मध्ये कोलंबो येथे झालेल्या आशियाई ज्युनियर अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये खुशबीरने कांस्यपदक मिळवले होते.

Leave a Comment