भारताचे तिरंदाजीत ऐतिहासिक ‘सुवर्ण’

incheon
इंचेऑन – भारताच्या पुरुष तिरंदाजी संघाने आशियाई स्पर्धेच्या आठव्या दिवशी अनोखी कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. यजमान दक्षिण कोरियाचा पराभव करत त्यांनी भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.

भारताच्या अभिषेक वर्मा, रजत चौहान आणि संदीप कुमार या तिरंदाजांनी दक्षिण कोरियावर २२७-२२५ असा विजय मिळवला. पहिल्या फेरीपासूनच भारतीय संघ आघाडीवर होता.

तर महिला तिरंदाजी संघाला कांस्यपदक मिळवता आले. भारताच्या त्रिषा देव, पूर्वषा शेंड्ये आणि सुरेखा ज्योती यांनी इराणच्या साकिनेश, मर्याम आणि शबनम यांचा २२४ – २१७ असा पराभव केला.

याआधी आशियाई स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी जितू रायने भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यानंतर सलग सात दिवस भारताला एकही सुवर्णपदक जिंकता आले नव्हते.

Leave a Comment