भाजपची पहिली यादी जाहीर – मोदींच्या प्रचारसभा होणार

bjp
मुंबई- शिवसेनेशी काडीमोड घेतल्यानंतर भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. यात मुंबई व पुण्यातील सर्व जागांचे उमेदवार जाहीर केले गेले असून त्यात ३६ आजी माजी आमदार, विधान परिेषद सदस्यांचा समावेश आहे. भाजपने पहिली १७२ नावांची यादी जाहीर करतानाच मिशन १४५ हा नवा संकल्पही जाहीर केला असून राज्यात किमान १४५ जागा जिकण्याचा निर्धार केला आहे.

सत्ता मिळाल्यास मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेले पंकजा मुंडे, देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि एकनाथ खडसे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखलही केले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असून ते १८ जागा लढविणार आहेत.भाजप वेगाने प्रचार कामाला लागली असून मिळालेल्या थोडक्या वेळात राज्य पिंजून काढण्याचा त्यांचा निर्धार आहे.

पुण्यातून कसबा मतदारसंघातून विद्यमान आमदार गिरीष बापट यांना पाचव्या वेळा तिकीट दिले गेले आहे. पर्वती मतदारसंघातून माधुरी मिसाळ, कोथरूडमधून मेधा कुलकर्णी, खडकवासलातून भीमराव तापकीर, कन्टोन्मेंटमधून दिलीप कांबळे यांना तिकीटे दिली गेली आहेत. मनसेतून भाजपात आलेले राम कदम यांना घाटकोपर पश्चिम मधून तिकीट मिळाले आहे.

Leave a Comment