तमीळनाडूची आता अम्मा सिमेंट योजना

amma
चेन्नई – तमीळनाडू सरकारने अम्मा किचन, अम्मा मिनरल वॉटर नंतर आता अम्मा सिमेंट योजना जाहीर केली आहे. मुख्यमंत्री जयललिता अम्मा नावाने राज्यात ओळखल्या जातात. त्यांच्या नावावरून या योजना सुरू केल्या जात आहेत.

अम्मा सिमेंट योजनेअंतर्गत सरकार खासगी सिमेंट उत्पादकांकडून स्वस्त दरात सिमेंट खरेदी करणार आहे आणि जेव्हा सिमेंटच्या किमती वाढतात तेव्हा मध्यमवर्गीय अथवा कनिष्ठ वर्गीयांसाठी गरजेनुसार १९० रूपये पोते या दराने पुरविणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आंध्राचे विभाजन झाल्यापासून तमीळनाडूला या राज्यातून होत असलेला सिमेंट पुरवठा घटला आहे. परिणामी राज्यातील सिमेंट कंपन्यांना दरवाढीची संधी मिळाली असून राज्यात सिमेंटचे दर वाढत चालले आहेत.

या योजनेचा फायदा प्रामुख्याने मध्यम व कनिष्ठवर्गीयांना होणार आहे. या नागरिकांना १५०० चौरस फुटाचे घर बांधण्यासाठी ७५० पोती सिमेंट सवलतीच्या दरात म्हणजे १९० रूपये पोते प्रमाणे मिळेल तर घरदुरूस्तीसाठी आवश्यकतेनुसार १० ते १०० पोती सिमेंट दिले जाणार आहे.

Leave a Comment