उच्च न्यायालयाचे प्रदीप शर्मांविरोधात जामीनपात्र वॉरंट

pradeep
मुंबई – लखनभैय्या बनावट चकमकप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने एन्काऊटर स्पेशालिस्ट वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांची निर्दोष मुक्तता केली. त्यांतर याविरोधात दोन अपिल करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही अपिल सुनावणीसाठी दाखल करुन घेत शर्मा यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

राज्य सरकारने शर्मा यांच्या सुटकेविरोधात एक अपील दाखल केले आहे. तर, दुसरे अपील लखनभैय्याचा भाऊ ऍड. रामप्रसाद गुप्ता यांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले. या दोन्ही अपिलांवर न्या. पी. व्ही. हरदास यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यानुसार शर्मा यांनी कनिष्ठ न्यायालयात हजर राहून १० हजार रुपयांच्या जामिनावर जामीन घ्यावा, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे. २००६ मध्ये लखनभैय्याची बनावट चकमकीत हत्या करण्यात आली. याप्रकरणी शर्मा यांची सत्र न्यायालयने सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली होती. तर, अन्य २१ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. यामध्ये १३ पोलीस अधिका-यांचाही समावेश आहे.

Leave a Comment