राखी असणार रिपब्लिकन पक्षाची स्टार प्रचारक!

rakhi
मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात काल घटस्थापनेच्या दिवशी प्रचंड उलथपलथ पाहायला मिळाली. भाजप- शिवसेनेची २५ वर्षांची युती अखेर संपुष्टात आली. दुसरीकडे, राष्ट्रवादीने कॉग्रेसचा हात सोडला तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बहुचर्चित ‘ब्ल्यु प्रिंट’ सादर केली. यासोबत पुन्हा राजकारणात कॉन्ट्रोवर्सी क्वीन राखी सावंत सक्रिय झाली आहे.

विधानसभेच्या रणधुमाळीत राखी सावंत ‍दिसणार आहे. परंतु ती निवडणूक लढवणार नाही नसून खासदार रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्टार प्रचारक असणार आहे. राखीने गेल्या काही दिवसांपूर्वी आरपीआयमध्ये प्रवेश केला आहे. राखी आरपीआयच्या महिला शाखेची राष्ट्रीय कार्याध्यक्षा आहे.

Leave a Comment