माझा पेपरची बातमी निघाली खरी; पुत्रप्रेमामुळेच तुटली युती

eknath
मुंबई : शिवसेना-भाजपची युती ही देशातील सर्वात जुनी युती अशी तिची खासियत होती आणि ही युती एका दिवसात तुटली नाही, तर त्यासाठी खतपाणी घालण्यात आले. आदित्य ठाकरे यांच्या मिशन १५० प्लस मुळे शिवसेना १५१ जागांच्या खाली आलीच नाही. यामुळे आणि मुख्यमंत्री कोणाचा यावरच्या घोळामुळे युती तुटली असे सडेतोड मत एकनाथ खडसे यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मांडले.

याबाबतची बातमी ‘माझा पेपर’वर दिनांक २३ सप्टेंबर रोजी झळकली होती. ती अशी की, शिवसेनेकडून नवख्या आदित्य ठाकरेंना युतीच्या जागावाटपाबाबत भाजपचे राज्य प्रभारी ओम माथूर यांच्यासारख्या अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्याशी चर्चा करण्याकरता पुढे करण्यात आले. मात्र शिवसेनेचा हा स्वभाव भाजपला रुचलेला नाही. पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने हा भाजपचा अपमान असल्याचे सांगितले.

या नेत्याने उद्या आदित्यच्या लहान भावाशीही आम्हाला चर्चा करावी लागेल, अशी कोपरखळीही शिवसेनेला मारली. युती तुटण्याची पहिली ठिणगी तिथेच पडल्याचेही भाजपच्या नेत्याने सांगितले.

अदित्य ठाकरे हे अगदीच अपरिपक्व आहेत. त्यांना अजून राजकारणाची जाण नाही. अशा स्थितीत देशपातळीवरील नेत्यांशी चर्चा करण्यासाठी त्यांना शिवसेनेकडून पाठवले जाते, हा प्रकार म्हणजे भाजपची चेष्टा करण्याचाच एक भाग आहे, असेही भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

Leave a Comment