
मुंबई – राज्यात सरकारचा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसने काढल्यामुळे सरकार अल्पमतात आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागु करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने कली आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा – खडसे
राज्यपालांकडे ही मागणी भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी केली आहे. यापूर्वी दिल्लीत सत्ता पालट करणारे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आळी आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरा बसणारे निर्णय गुरुवारी झाले. शिवसेना भाजप युतीपाठोपाठ आघाडीही संपुष्टात आली. आता राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमधून बाहेर पडली आहे.
राष्ट्रवादीला १४४ जागा न देण्याची आणि मुख्यमंत्री पद विभागून न देण्याच्या काँग्रेसच्या हेकेखोर भूमिकेमुळे स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली.
