पहिल्या आयपीटीएल स्पर्धेचे आकर्षण ठरणार सेरेना, अगासी, रॅफ्टर

iptl
नवी दिल्ली – २ ते ४ डिसेंबर दरम्यान भारतात होणा-या पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रिमियर टेनिस लिग स्पर्धेसाठी (आयपीटीएल) सिंगापूरच्या फ्रांचायझीने अमेरिकेची अव्वल टेनिसपटू सेरेना विल्यम्स, अमेरिकेचा माजी टेनिसपटू आंद्रे अगासी आणि जर्मनीचा पॅट्रिक रॅफ्टर यांच्याशी करार केला आहे.

आयपीएलच्या धर्तीवर भारतात आता टेनिस तसेच फुटबॉल स्पर्धा भरविली जात आहे. आयपीटीएलचे प्रमुख संस्थापक महेश भुपती असून भारतीय टेनिस शौकिनांना विदेशी टेनिसपटूंचा खेळ पाहण्याची संधी या स्पर्धेने पहिल्यांदाच उपलब्ध करून दिली आहे. सेरेना विल्यम्स, ऍगास्सी, रॅफ्टर, झेकचा बर्डिच, हंतुकोव्हा, सोरेस, ऑस्ट्रेलियाचा हेविट, किरॉईस, सर्बियाची इव्हानोव्हिक, बुचार्ड, त्सोंगा, मोनफिल्स, गॅस्केट, इव्हानिसेव्हिक, मोया हे अव्वल टेनिसपटू या स्पर्धेत आपला सहभाग दर्शवित आहेत. आशियाई टेनिस फेडरेशनने या स्पर्धेला अधिकृत मान्यता दिली आहे. या स्पर्धेतील एकूण बक्षीसाची रक्कम १० लाख अमेरिकन डॉलर्स ठेवण्यात आली आहे.

Leave a Comment