जिओनीचा ई-लाईफ स्मार्टफोन गिनीज बुकात

gionee
चीनी हँडसेट कंपनी जिओनीचा ई लाईफ एस ५.१ हा स्मार्टफोन जगातील सर्वात स्लीमेस्ट स्मार्टफोन म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये नोंदला गेला आहे. केवळ ५.१ मिमी जाडीचा हा स्मार्टफोन चीनमध्ये नुकताच लाँच झाला असून तो भारतात नोव्हेंबर मध्ये लाँच केला जाणार असल्याचे इंडिया हेड अरविंद व्होरा यांनी जाहीर केले आहे.

आमच्या स्मार्टफोनची गिनीज बुकमध्ये नोंद झाल्यामुळे आमचा उत्साह वाढला आहे असे कंपनी प्रमुखांचे म्हणणे आहे. हा स्मार्टफोन ग्लास आणि मेटलमध्ये उपलब्ध असून त्याचा स्क्रीन ४.८ इंचाचा आहे. १६ जीबी इंटरनल मेमरी, ८ एमपीचा रिअर कॅमेरा, एलटीई कनेक्टिव्हीटी अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. हा फोन भारतात लाँच करण्याचा निर्णय कंपनीने २०१३ मध्येच घेतला होता. जिओमीने अनेक भारतीय ब्रँड फोन कंपन्यांसाठी मूळ उत्पादक म्हणूनही या पूर्वी उपकरणे पुरविली आहेत असेही सांगितले जात आहे.

Leave a Comment