चितोडगडच्या कालिका मंदिरात ४०० वर्षे तेवतोय नंदादीप

kalika
देशभरात नवरात्राची धामधूम सुरू झाली आहे. महाराणा प्रतापामुळे भारतीय शौर्याच्या इतिहासात अजरामर झालेला चितोडगड तेथील कालिका मंदिरासाठीही ओळखला जातो. अतिशय सुंदर कलाकुसरीने नटलेले आणि सर्वांगसुंदर कोरीवकाम असलेले हे मंदिर आठव्या शतकातील आहे. तत्कालीन राजा बाप्पा रावळ यांनी हे मंदिर बांधले. आठव्या शतकातील प्राचीन मंदिरात या मंदिराचे महत्त्व मोठे मानले जाते.

वास्तविक हे मंदिर सूर्यमंदिर म्हणून बांधले गेले होते. मात्र १४ व्या शतकात आलेल्या महाराणा हमीरसिंह याने येथे कालिका देवीची मूर्ती स्थापन केली आणि तेव्हापासून ते कालिका मंदिर म्हणून प्रसिद्धीस आले. १६ व्या शतकात राज्यावर आलेल्या राणा लक्ष्मणसिंह याने या मंदिरात नंदादीप प्रज्वलित केला आणि आज ४०० वर्षांनंतरही हा नंदादीप अखंड तेवता आहे असे मंदिराचे पुजारी अरविंद भटट सांगतात.

कालिका देवी ही किल्याची रक्षक मानली जाते. ती वीरता आणि शक्तीचे प्रतीक म्हणून पुजली जाते. मंदिराचे स्थापत्य अतिशय सुंदर आहे. दरवर्षी नवरात्रात येथे मोठा सोहळा साजरा केला जातो आणि राजस्थानातून मोठ्या प्रमाणावर भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात.

Leave a Comment