इंजिन देणार धनुष्यबाणाला साथ?

combo
मुंबई – राज्याच्या राजकारणात आता आणखी एक मोठी घटना घडण्याची धुसुर शक्यता असून सुत्रांच्या माहितीनुसार मनसे आणि सेनेच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. मात्र ही चर्चा फक्त प्रकृतीच्या चौकशीपुरतीच मर्यादित होती असे सांगितले जात आहे.

मात्र, राजकीय वर्तुळात या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना साथ देण्याविषयीची प्राथमिक बोलणी केल्याची चर्चा रंगल्यामुळे या दोन्ही पक्षांची मोट बांधली जाण्याची शक्यता आता निर्माण झाल्याचेही राजकीय विश्लेषक म्हणतात.

महायुतीतील घटक पक्षांसह भारतीय जनता पक्षाने काडीमोड घेतल्यानंतर एकाकी पडलेल्या शिवसेनेला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ लाभल्यास भाजपला मात्र याचा फटका बसणार आहे. शिवसेना आणि मनसे प्रमुख असलेले बंधु एकमेकांच्या संपर्कात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मात्र, या दोन्ही पक्षाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. महायुती आणि आघाडी तुटल्यामुळे राज्यातील सर्वच राजकीय गणिते बदलली आहेत. भाजपने मित्र पक्षांना सोबत घेऊन आपली वाटचाल सुरु केली आहे.

Leave a Comment