
इंचेऑन – भारतीय पुरुष नेमबाज गटाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी रौप्यपदक मिळवले आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी एक रौप्यपदक
२५ मीटर फायर पिस्तोल सांघिक प्रकारात भारताच्या विजय कुमार, पेम्बा तमंग आणि गुरप्रीत सिंगने रौप्यपदक पटकावले. त्यांचे सुवर्णपदक केवळ एका गुणामुळे हुकले. यजमान कोरियाने १७४० गुणांसह सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.
२०१२ मध्ये ऑलिंपिक स्पर्धेत कांस्य़पदक मिळवणा-या विजयने १००, ९८, ९६ असे गुण मिळवले तर तमंगने ९९.९७,९९७ आणि गुरप्रीतने ९५, ९६,९७ असे गुण मिळवले. यासोबत पदकतालिकेत भारताच्या रौप्यपदकांची संख्या दोनवर पोहोचली आहे. याआधी स्क्वॉशपटू सौरव घोषालने रौप्यपदक पटकावले होते.
