कोलंबो – श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने माजी कर्णधार मर्वान अट्टापटूची ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड येथे होणा-या आगामी विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर संघाच्या प्रशिक्षकपदी निवड केली असून मात्र ही निवड करताना प्रशिक्षकपदी अट्टापटूचा कालावधी किती असेल याची माहिती मात्र दिली नाही.
श्रीलंकेच्या प्रशिक्षकपदी अट्टापटूची निवड
एप्रिलमध्ये संघ प्रशिक्षक पॉल फॅब्रेस यांनी राजीनामा दिल्यानंतर हंगामी प्रशिक्षक म्हणून अट्टापटूची निवड करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेने इंग्लड व पाकिस्तानविरुद्ध झालेल्या कसोटी व एकदिवसीय मालिका जिंकली होती. १९९९ साली प्रशिक्षकपदी राहिलेल्या रॉय दास याच्यानंतर अट्टापटू हे पहिलेच प्रशिक्षक आहेत. २ नोव्हेंबरपासून इंग्लडविरुद्ध होणा-या एकदिवसीय मालिकेच्या पार्श्वभूमीवर अट्टापटूची निवड महत्वाची मानली जात आहे.